Ad will apear here
Next
कुटुंबाच्या सहकार्यानेच प्रगतीची शिखरे गाठली; मान्यवर ‘मायलेकीं’चा सूर
(डावीकडून) अंजली मराठे-अनुराझा मराठे, शिल्पा बापट-सानिका बापट, अरुंधती पटवर्धन-डॉ. सुचेता भिडे-चापेकर, शुभांगी दामले

पुणे :
‘स्त्रीला मुलगी, पत्नी, आई अशा अनेक भूमिकांमधून जावे लागते. त्यामुळे घरून सहकार्य मिळाले नाही, तर बाहेर काही काम करणे शक्य होणार नाही. आम्हाला माहेरून आणि सासरहूनदेखील पाठिंबा मिळाल्याने इथपर्यंत पोहोचू शकलो,’ असा सूर नृत्य, गायन, मेकअप क्षेत्रातील मान्यवर महिलांनी व्यक्त केला.

शारदास्तवनावर सादरीकरण करताना अरुंधती पटवर्धन

पुण्यातील हिंदू महिला सभेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘आम्ही मायलेकी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गप्पा, गाणी व नृत्य यांची खुमासदार मैफल आणि मुलाखती आदींचा त्यात समावेश होता. ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे व कन्या अंजली मराठे यांचे गायन, ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर व कन्या अरुंधती पटवर्धन यांचे नृत्य यांचा आनंद सर्वांना घेता आला. तसेच या चौघींसह मेकअप आर्टिस्ट शिल्पा बापट व कन्या सानिका बापट यांच्याशी शुभांगी दामले यांनी संवाद साधला. या वेळी हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले, ‘कलाक्षेत्र साडीज’चे उर्मिला व सागर पासकंटी, ‘सिल्क अँड सॅटिन ब्युटी पार्लर’च्या मोनिका पाळंदे आदी सभासद व मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सुचेता भिडे-चापेकर

या वेळी सगळ्यांनी आपापल्या करिअरच्या प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. गाणी, नृत्याभिनय आणि किश्श्यांची खुमासदार मैफल या वेळी रंगली. काही दृकश्राव्य फितीही या वेळी दाखविण्यात आल्या. यावेळी अंजली मराठे यांनी शारदावंदन गायले व अरुंधती पटवर्धन यांनी ते नृत्यातून सादर केले. समारोपावेळी अनुराधा मराठे यांनी ‘सर्वात्मका शिव सुंदरा..’ ही रचना गायली आणि डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी नृत्य सादरीकरण केले. सानिका बापट यांनी या वेळी मेक-अपचे प्रात्यक्षिक दाखविले. 

सुचेता भिडे म्हणाल्या, ‘माझ्या वडिलांना कलेची आवड असल्याने मला नृत्य शिकवायचे असे त्यांनी मी लहान असतानाच ठरवले होते. यात माझे करिअर व्हावे यासाठी ते कायम प्रयत्नशील असायचे. तीच साथ मला लग्नानंतरही मिळाली. वडील चित्रकार होते. चित्र आणि नृत्याचा खूप जवळचा संबंध आहे. तो उलगडत असताना मला नृत्य अधिकच उलगडत गेले.’

आईविषयी बोलताना अरुंधती म्हणाल्या, ‘आईला नावीन्याची आवड असल्यामुळे तिच्या अनेक लहान गोष्टींमधूनही खूप शिकायला मिळते. सर्जनशीलता आणि पारंपरिकता यांचा ती खूप छान मेळ घालते.’

अनुराधा मराठे यांनीदेखील आपला प्रवास उलगडला आणि घर सांभाळून गाण्याची आवड कशी जपली याच्या आठवणी सांगितल्या. ‘आईचे गाण्याचे क्लास घरात चालत, ते ऐकत ऐकत मी आपोआप शिकत गेले. तिच्या इतर शिष्यांबरोबरच माझेही शिक्षण झाले,’ असे त्यांची कन्या अंजली यांनी सांगितले.

शिल्पा बापट व कन्या सानिका बापट यांनीदेखील आपले अनुभव सांगितले व प्रात्यक्षिकातून काम रसिकांसमोर मांडले.

मेकअपचे प्रात्यक्षिक दाखविताना सानिका बापट
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZWWCK
Similar Posts
अर्भकाला जीवनदान देणाऱ्या कचरावेचक महिलांचा सत्कार पुणे : विश्रांतवाडीतील एकतानगरमध्ये कचराकुंडीत टाकलेल्या नवजात मुलीला जीवदान देणाऱ्या लक्ष्मी राजू डेबरे आणि मंगल जाधव या कचरावेचक महिलांचा पुणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी स्वच्छ संस्थेच्या व येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला
जेनेट, रामेश्वरी, अभिलाषा ठरल्या ‘दी गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र’ पुणे : व्हाईट डिव्हाईन इव्हेंट्सच्या वतीने आयोजित ‘दी गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र २०१९’ या सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पुण्याच्या जेनेट अग्रवाल (इटर्नल ब्युटी), पुण्याच्या रामेश्वरी वैशंपायन (मिसेस) आणि चाळीसगावच्या अभिलाषा जाधव (मिस) यांनी पटकावले, तर इटर्नल ब्युटी प्रकारात औरंगाबादच्या स्वाती चव्हाण,
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा तीन विरुद्ध दोन गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या या दोन्ही मल्लांनी असंख्य कुस्तीशौकिनांना थरारक अनुभव दिला. या लढतीत
दाते स्मृती संस्थेच्या वतीने डॉ. अशोक चौसाळकर यांना जीवनगौरव पुणे : वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने पहिल्या डॉ. यशवंत सुमंत जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी यंदा डॉ. अरुण शिंदे (कोल्हापूर), ब्रायन लोबो (पालघर ) व डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language